रोहित काळे यांची एसडीजी युथ ॲम्बेसॅडरपदी निवड

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रोहित काळे यांची एसडीजी युथ ॲम्बेसॅडरपदी (भारत) नियुक्ती झाली आहे.

एसडीजी ॲम्बेसॅडर ड्राईव्हः पुढाकाराने प्रत्येक गावकरी व शहरी नागरिकांना एसडीजीची उद्दीष्टे आणि त्यांचे गौरव, त्यांची भूमिका व एसडीजीच्या प्रगतीविषयीची जबाबदारी आणि कृती आणि त्यांना एकत्रितपणे भाग घेण्यास व राष्ट्र उभारणीत हातभार लावण्याची कल्पना आहे जे की निती आयोग राबवत आहे.

त्या साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ऐम्बैसडर हे पद दिले जात आहे त्या पैकी जळगाव मधील मुक्ताईनगर येथील रोहित काळे यांना एसडीजी युथ ॲम्बेसॅडर (भारत) हे पद देण्यात आले आहे.

या सोबत त्यांची नियुक्ती 16 तारखेला महाराष्ट्र एसडीजी युवा परिषदेच्या सह-अध्यक्ष पदी झाली आणि सोबत राष्ट्रीय मंडळाचे सदस्य (यूएनएसीसीसी) पदी सुद्धा निवड करण्यात आली आहे.

 

Protected Content