भुसावळ ब्रेकींग : नाल्यात पडून बालकाचा दुदैवी मृत्यू; नागरीकांचा तीव्र संताप !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोडवरील नाल्यात तीन वर्षीय बालक पडून दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. या घटनेमुळे भुसावळ नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या बालकाचा शोध लागला आहे.

अर सलान उर्फ बाबू बिहारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडिल नसरुद्दीन हे खडका रोड येथे मुजम्मिल खान यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास आहे. वरच्या बाजूस घर आणि खाली दुकान आहे. रविवारी सकाळी ११ वाजता देखील तो वडिलांसोबत आला. खडका रोडवरील बिलाल कांडप मशिन या दुकानाबाहेर खेळत होता. याच ठिकाणी ३० फूट खोल व सहा फूट रुंद नाला आहे. अरसलाम हा खेळता खेळता नाल्यामध्ये पडला. अर्धा-एक तास झाला तरी अरसलान हा कुठेच आढळून न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी शोध घेतला. अखेर सोशियल मीडियावर अरसलान हरविल्याची रात्री उशिरापर्यंत देखील काहीच पत्ता लागला नाही.

माजी नगरसेवक आशिक खान यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तर अरसलान हा खेळता खेळता नाल्यात पडल्याचे दिसले. मात्र हे फुटेज तपासण्यास उशिर झाल्यामुळे या बालकाचा नाल्याच्या गाळात अडकून मृत्यू झाला होता. काही नागरिकांनी शिडी लावून ३० फुट नाल्यात उतरून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, नागरीकांनी भुसावळ नगर पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Protected Content