किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासवा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून यात ११ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, बुधवारी रात्री कासवा गावात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात फिर्यादी पवन पंढरी कोळी, पंढरी बारकु कोळी, बापू शांताराम सपकाळे व मनकर्णिका बाई रमेश तायडे हे चार जण जखमी झाले आहेत.

या घटने प्रकरणी पवन कोळी यांनी फिर्याद दिल्यावरून विनोद सपकाळे, सोपान सपकाळे, जगदीश सपकाळे, विकास सपकाळे, जितू सपकाळे, ललित सपकाळे, संजय सपकाळे, कमलाकर सपकाळे, लहू सपकाळे, सुकदेव सपकाळे व भूषण सपकाळे (सर्व रा. कासवा, ता. यावल) यांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.

Protected Content