दत्त ठिबकतर्फे कोविड केअर सेंटरला मदत

फैजपूर, ता. यावल, प्रतिनिधी । येथील ख्यातनाम दत्त ठिबक या कंपनीतर्फे कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनच्या तरतुदीसाठी प्रशासनाला मदत करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक युगंधर जितेंद्र पवार यांनी याचा धनादेश प्रांताधिकारी कैलास कडलग यांना प्रदान केला.

याबाबत वृत्त असे की, न्हावी रस्त्यावरील कोविड सेन्टरला कोविड रुग्णांसाठी,ऑक्सीजन सिलेंडर उभारणीसाठी दत्त ठिबकचे संचालक युगंधर जितेंद्र पवार यांच्या कडून कै, जितेंद्र पवार सर यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत निधीची उपलब्धता करून दिला आहे. समूहाच्यावतीने त्यांनी १५ हजार रुपये फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी नायब तहसीलदार रशीद तडवी उपस्थित होते

न्हावी रस्त्यावरील कोविड सेन्टरला कोविड रुग्णांसाठी,ऑक्सीजन सिलेंडर उभारणीसाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते, त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

रावेर-यावल तालुक्यातील कै जितेंद्र पवार सर हे सामाजिक बांधिलकी, समाज प्रती संवेदनशीलता , कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील होते. त्यांनी अतिशय संघर्षातून शिखर गाठले. मात्र जमीनीवर आपले पाय घट्ट ठेवले होते. पण
अचानक त्यांच्या वर काळाने दुर्दैवाने झडप घातली. मात्र काळाच्या क्रूर आघाताने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. यानंतर त्यांचे सुपुत्र युगंधर जितेंद्र पवार हे तेवढ्याचं आत्मयीतेने कै. जितेंद्र पवार सर यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेत समाजाचं ऋण फेडण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.

या अनुषंगाने युगंधर जितेंद्र पवार यांनी प्रशासनाला पंधरा हजार रूपयांची मदत करून सामाजिक जाणिवेचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Protected Content