वन जमिनीत शेती केल्याने एकास मारहाण ; तिघांविरोधात तक्रार दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मालोद येथे वन विभागाच्या जमिनीवर तूर पेरल्याने एकास तिघांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने यावल पोलिसात तिघां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास सुका भिल हा मालोद येथे आडगाव रस्ता पुलाजवळ  पत्नी व २ मुले व २ मुली यांच्यासह वास्तव्यास आहे. तो मालोद शिवारातील झाडी भागातील वनविभागाच्या जमीनीवर पिक पेरुन तसेच मजुरी करुन कुटुंबाचा उदर्निवाह करतो. कैलास हा गुरुवार दि-३० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वन विभागाच्या जमीनीवर ८ दिवसापूर्वी पेरलेली तूर पाहण्यासाठी व चुलीस लागणारे सरपण आणणे कामी गेला होता. यावेळी सरपण गोळा करीत असतांना सायंकाळी ५.३० वाजेचे सुमारास भारसिंग तेरसिंग बारेला. (रा. बाघमीरा, ता यावल) याने २ अनोळखी व्यक्ती सोबत येवून कैलास भिल यास शिवीगाळ केली. तसेच या वन जमीनीत तूर का पेरली अशी विचारणा करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका व्यक्तीने कैलास यास पकडुन ठेवून दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या डोक्यात मागील बाजुस तसेच अंगावर व पाठीवर काठी मारुन दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली. कैलास भिल याने तिघा विरोधात यावल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content