भोकर नदीतून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

raver walu wahatuk

रावेर (प्रतिनिधी) । महसूल पथकाने अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. आज सकाळच्या सुमारास भोकर नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसूल पथकाने अचानक धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे.

अवैध वाळू वाहतूकदारांना सुमारे 1 लाख 25 हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. रावेर परिसरातील तापी, भोकर, सुकी नद्यांचा अजून कोणत्याही वाळूचा ठेका झालेला नाही, तरी सुध्दा अवैध चोरटी वाळू वाहतूक दिवसासोडून रात्र करीत आहे. परंतु वाळू वाहतूकदारांच्या मनसुब्यावर पाणी फिरवत रात्री-दिवसा करवायाचा धडाका सुरुच आहे. आज सकाळच्या सुमारास एमपी 12 ए 3136 नंबरचे टॅक्टर भोकर नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती रावेर प्रशासनाला मिळाली.

यांनी केली कारवाई
अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती रावेर प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पी.डी.आळे, तलाठी रावेर दादाराव कांबळे, तलाठी खानापूर भरत वानखेडे, तलाठी पिंप्री यासिन तडवी, तलाठी के-हाळे शैलेश झोटे, तलाठी पाल बारेला, तलाठी वाघोड निलेश पाटील यांच्या टिमने कारवाई केली.

Protected Content