जळगावातील प्रेमनगरातून गॅस हंडी व दुचाकी लंपास; अज्ञातांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर हाती काहीच न मिळाले नाही. मात्र चोरट्यांनी गॅस हंडी व कपाउंडमध्ये लावलेली दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी शहरातील प्रेमनगरातील लक्षमन नगरात उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहितीप्रमाणे, योगेश वामन वाणी-कामळस्कर (वय-४८, रा.लक्षमन नगर) हे प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. ते पत्नी कांचन, मुलगा आदित्य, मुलगी समीक्षा असे वास्तव्यास आहेत. शनिवारी तळ मजलावरील घराची आतून कडी बंद करून कुटूंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान रात्री चोरट्यांनी घरावर पळत ठेवत मागच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून आत प्रवेश केला.

घराच्या कपाटातील सामान अस्तव्यस्त करत मुद्देमालाचा शोध घेतला. परंतू चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी गॅस हंडी घरातून नेली. त्यानंतर कपाउंडमध्ये लावलेली दुचाकी क्रमांक (एमएच १९ ए.के. ६३३३) या दूचाकीचे लॉक तोडले. त्यानंतर मुलगा आदित्य याची मोपेड दुचाकी क्रमांक (एमएच १९ ए.के. ६३३३) हिचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. योगेश यांची दुचाकी व हंडी घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी योगेश यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Protected Content