गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात दोन पोलीस अधिकारी शहीद

गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अलदंडी-गुंडूरवाहीच्या जंगलात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०) व सी 60 पथकाचे शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले आहेत.

 

 

भामरागड तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, या मोहिमेंतर्गत सी ६० कमांडो पथकातील पोलीस नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सी ६० कमांडो पथकावर अचानक हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला पथकातील पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम हे शहीद झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलिसांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील तर शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

Protected Content