डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचा ‘संवाद’तर्फे सत्कार

पुणे प्रतिनिधी | भारतीय विदेश सेवेतील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांचा ‘संवाद’ या संस्थेतर्फे नुकताच ह्द्य सत्कार करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, भारतीय विदेश सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना त्यांच्या ‘माती, पंख आणि आकाश’ या पुस्तकास गुजरात साहित्य अकादमीतर्फे २०१८ या वर्षातील उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. या निमित्त संवाद पुणे आणि समस्त पुणेकरांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉ. मुळे यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या मुख्य ऊपस्थितित सत्कार सोहळा संपन्न झाला. संवाद पुणेफे सुनील महाजन, निकिता मोघे व महाराष्ट्र साहित्य,कला प्रसारणी सभा चे कार्याध्यक्ष सचिन इटकर उपस्थित होते.

Protected Content