आईसह तीन दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) चेंबूर परिसरात आईसह तीन दिवसांच्या बाळाला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२६ मार्च रोजी ही महिला पतीसोबत डिलिव्हरीसाठी चेंबूर येथील हॉस्पिटलला गेली होती. डिलिव्हरीनंतर महिला आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. कोरोनाग्र्स्त महिलेच्या पतीने आरोप केलाय की २९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आले. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेने आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले. पत्नीला कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड दिला होता. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली. ज्या दिवशी माझ्या पत्नीला हॉस्पिटलला दाखल केले त्याच्या दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलला समजले की, माझ्या पत्नीच्या बाजूला असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांनी हे आमच्यापासून लपवून ठेवले असा आरोप देखील पतीने केला आहे. सध्या या दोघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Protected Content