महामारीचा खानदेशमधील इतिहास (ब्लॉग)

सध्या कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अर्थात, मानवी इतिहासात असे अनेक प्रसंग आलेले आहेत. आजवर अनेक प्रकारच्या महामारींचा फटका आपण सहन केला आहे. यात अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता खान्देशात देवी, प्लेग, फ्ल्यू आदींसारख्या विकारांमुळे हजारोंचे प्राण गेले होते. याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांचा खानदेशातील महामारींचा आढावा घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख आपल्याला सादर करत आहोत.

कोरोनाच्या उद्रेकामुळे काळजीने अवघे जग धास्तावले आहे. या महा भयंकर महामारीवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य नंतर महामारीचे हे सर्वांत मोठें संकट म्हणता येईल. वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीचा मोठा पल्ला गाठूनही, कोरोना ने जे आव्हान उभे केले आहे, ते सर्वांनाच अंतर्मुख करणारे असले तरी याला नियंत्रणात आणण्यासाठी वैश्‍विक लढा सुरु आहे. कोरोनाच्या उद्रेकाने भूतकाळातील महामारीचे स्मरण या निमीत्ताने करून दिले आहे. खानदेश पुरतं या संदर्भात विचार केला तर देवी रोगाची साथ, कॉलरा, पटकी, आणि प्लेग च्या महामारीने हजारोंचा बळी घेतला. ब्रिटिश सरकारच्या काळात यासंदर्भात गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी थरकाप उडवून देणार्‍या आहेत.

देवी रोगाची साथ….१०५६ बळी

खान्देशात सन १८५६ मध्ये देवी रोगाचा उद्रेक होऊन यात तब्बल १०५६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स.न.१८१८ मध्ये कालरा या रोगाने थैमान घातले. खानदेशचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी कॅप्टन ब्रिज यांनी सादर केलेल्या अहवालानुसार १८१८ मध्ये त्यांच्या ५०० सैनिकांच्या तुकडीतील ८४ सैनिक कालर्‍यामुळे मरण पावले. या अहवालानुसार १८१९ मध्ये ११ हजार ५२२ लोक मृत्यूमुखी पडले. कालराच्या साथीने सावदा (ता.रावेर), रांजणगाव (ता.चाळीसगाव), पाचोरा, शिरपूर आदि भागात अक्षरश: थैमान घातले होते. खानदेश प्रांताने त्या काळात अनुभवलेलं संकट व त्यातून सावरून पुन्हा घेतलेली उभारी त्यांच्या धैर्याची परिसीमा म्हणावी लागेल.

प्लेगचा प्रकोप

स.न १९०० नंतर स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली…परन्तु पुन्हा साथीच्या रोगाने घेरले. या काळात प्लेग या भयंकर महामारीने गाव ची गावं गिळंकृत केली. प्लेगने निर्माण केलेल्या दहशतीने ब्रिटीश शासक ही कमालीचे धास्तावले. उपचारालाही संधी न देणार्‍या या रोगाने त्या काळातील वैद्यकीय क्षेत्राला हतब ल केले. स.न.१९११ मध्यें पूर्व खानदेशात (आताचा जळगाव जिल्हा) ४०७३ तर तर सन १९१६ मध्ये १७,८१७ बळी घेतले . एवढया मोठ्या नरसहराने जनजीवन पुरते कोसळले.

देवी प्रतिबंधक लस

सततच्या महामारींमुळे जेरीस आलेल्या ब्रिटिशांनी दीर्घकालीन उपाय योजनांवर आपले लक्ष केंद्रित केले. स.न. १८४६ मध्ये खान्देशात प्रथमच तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लस टोचकांची नियुक्ती केली. त्यासाठी धरणगाव येथे मुख्यालय निर्माण करण्यात आले. देवी रोगावर लस शोधणारे डॉ. एडवर्ड जेन्नर हे ब्रिटिशच होते, त्यांनीच हा रोग हद्दपार केला. सुरवातीला लसीकरणास तीव्र विरोध केला गेला. हा विरोध भिती पोटी होता. मात्र शासनाने सक्ती केल्याने विरोध काहीसा मावळला. राबविण्यात आ लेला कार्यक्रम : सन १८७९ -८०, १८९३ ९४, १९११-१२, सन १९२१-२२ या कालावधीत २ लाख १९ हजार लोकांना लस टोचली. सन १९६२ पासून राष्ट्रीय देवी रोग निर्मूलन योजना लागू करण्यात आली आणि रोग हद्दपार झाल्या नंतर सन १९७८-७९ पासून लसीकरण योजना बंद करण्यात आली.

suresh ujjainwal

सुरेश उज्जैनवाल : ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक

Protected Content