पीआरसी सदस्य जानकरांनी घेतली प्रतिमा अनादर प्रकरणाची दखल

रावेर प्रतिनिधी | रावेरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील महापुरुषांच्या अनादर झाल्याच्या प्रकरणाच्या वृत्ताची खुद्द पंचायत राज समिती सदस्य तथा माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी दखल घेतली असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.

पंचायत राज समिती जळगाव जिल्हा दौर्‍यावर असून या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद जळगाव ते पंचायत समिती रावेर सर्व दूर स्वच्छता रंगरंगोटी करण्याचे काम सुरु असून विविध विकास कामांच्या योजनांची पडताळणी सुरु असतांना रावेरातुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील गटशिक्षणाधिकारी विभागात पूज्य साने गुरूजी, मदर टेरसा, यांचे फोटो केव्हाही कोसळण्याची शक्यता असून अस्त-व्यस्त स्थितीत लटकवले होते.तर पहीली ते सातवीच्या विद्यार्थीची पुस्तके अशा प्रकारात पडली होती. मुलांना स्वच्छतेचा संदेश देणारी शिक्षण व्यवस्था रावेरात प्रचंड कोंडीत सापडली आहे. विशेष म्हणजे या कार्यलयात रोज गटशिक्षणाधिकारी येऊन बसतात परंतु त्यांना या गोष्टीचे जराही गांभिर्य दिसत नाही या कार्यालयाला पंचायत राज समितीने भेट देण्याची मागणी सुज्ञ नागरीकांमधुन व्यक्त होत आहे.

अनादर प्रकरण गंभीर; माजी मंत्री जानकर

दरम्यान पंचायत राज समिती दौर्‍याची गांभिर्य न घेता रावेरात शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेच अनादर होत.असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला होता. याची दखल पंचायत राज समिती सदस्य तथा माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी घेतली असून अनादरचा प्रकार गंभीर असून याची आम्ही दखल घेऊ असे माजी मंत्री महादेव जानकर यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले. यामुळे आता या प्रकरणी कुणावर कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

Protected Content