राणेंवर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप – कागदपत्रे सादर केले नाही तर बंगल्यावर हातोडा !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला असून बांधकाम नियमिततेची योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी त्यांना १५  दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास महानगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेटसह वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नाहीत असे पालिकेने म्हटले आहे.

नेमका काय आहे वाद ?

राणे यांनी जुहूतील ‘अधिश’ बंगल्यात ‘सीआरझेड 2’ मध्ये अंतर्गत बांधकाम केले होते; मात्र याबाबत महापालिकेला कोणतीही माहिती सादर केली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत 351(1)ची नोटीस राणे यांना देण्यात आली आहे. यापूर्वी राणे यांना ‘केलेले बदल मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास महापालिकेने सांगितले होते. राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली मात्र यावर पालिकेचे समाधान झाले नसून केलेल्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत वाढीव बांधकामाचा उल्लेख नसल्याचेही पालिकेने म्हटले आहे.

Protected Content