कुऱ्हाड खुर्द सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी संपन्न झाली. निवडणूक निकाला प्रसंगी काही किरकोळ वाद झाल्याने निकाल रात्री उशिरा घोषित करण्यात आला.

 

निवडणुकीसाठी भाजपाप्रणित शेतकरी सहकार विकास पॅनलसाठी संजय शांताराम पाटील, अजय तेली, संतोष चौधरी यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले. या पॅनलला सर्वच्या सर्व १३ जागांवर घवघवीत यश प्राप्त झाले तर शिवसेनाप्रणित सहकार परिवर्तन पॅनलसाठी अरुण पाटील, कैलास भगत, शंकर बोरसे यांनी भाग घेऊनही १३ पैकी एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण जागेसाठी देशमुख रामदास नारायण (३९०), बोरसे अरुण श्रावण (३८६), चौधरी संतोष भिका (३८३), चौधरी विष्णू नामदेव (३७३), चव्हाण रवींद्र महादू (३७३), तेली काशिनाथ जुलाल (३७१), माळी नामदेव मोतीराम (३५९), कहाकर अकबर शेख (३४६), महिला राखिव जागांंसाठी – माळी सीताबाई दिगंबर (३९२), शिंदे राधाबाई रवींद्र (२८९), इतर मागासवर्गीय जागेसाठी महाजन सुधाकर नारायण (३९८), अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी भिवसने रमेश सोमा (३७७), विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून देशमुख श्रावण पुंडलिक (३८८), तर सहकार परिवर्तन पॅनलच्या पराभूत उमेदवारांमध्ये बोरसे शंकर नामदेव (२७०), चौधरी शेणफडू शंकर (२४६), हकीम शेख गंभीर (२४३), महाजन श्रीधर विठ्ठल (२७४), माळी अनिल दगडू (२६०), मोगरे विष्णू वसंत (२६५), पाटील कौतीक शिवराम (२६८), शेजुळ भागवत आनंदा (२६०), महिला राखिव मतदारसंघातील माळी कल्पना शिवाजी (२९१), पाटील कल्पना शिवाजी (२७१), इतर मागासवर्गीय मतदारसंघातुन चौधरी लाखीचंद (२७६), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात तडवी फकिरा उखरडू (२९०), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील देशमुख कैलास रावसाहेब (२८६), याप्रमाने मतदान मिळाले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. वी. पाटील तर सहायक निवडणूक अधिकारी संस्थेचे सचिव बोरसे यांनी काम पाहिले.

Protected Content