गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांची आमदारकी रद्द ; गुजरात हायकोर्टाचा निकाल

गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरात हायकोर्टाने ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवली आहे. त्यामुळे गुजरातचे कायदामंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांची आमदारकी रद्द झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार आश्विन राठोड यांनी बॅलेट पेपरच्या मतमोजणीच्या वेळी फेरफार केल्याच्या आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने हा निकाल दिला.

 

गुजरात विधानसभेसाठी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून भूपेंद्रसिंह चुडासामा हे भाजपाचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून आश्विन राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निकालात चुडासामा यांनी आश्विन राठोड यांचा ३२७ मतांनी पराभव करत विजय संपादन केला होता. निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार राठोड यांनी मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. ४२९ मतं मोजण्यात आली नाही, असा आरोप केला होता. राठोड यांनी गुजरात हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. अखेर तीन वर्षानंतर हायकोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याचा ४२९ पोस्टल मतदान रद्द करण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला. ही ४२९ मतं रद्द झाल्यामुळे चुडासमा यांना ३२७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. दरम्यान, कॉंग्रेसने निर्णयाचे स्वागत केले तर चुडासामा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Protected Content