Home क्राईम हॉस्पीटलच्या वॉचमनला बेदम मारहाण

हॉस्पीटलच्या वॉचमनला बेदम मारहाण

0
34


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हॉस्पिटल येथील वॉचमनला एकान बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील राजगड हॉस्पिटल येथे चंद्रभान देवचंद पाटील (वय-५५) रा. पाळधी ता.जि.जळगाव हे वाचमन म्हणून नोकरीला आहे. दरम्यान मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा शुभम ज्ञानेश्वर चौधरी हा तिथे दवाखान्यासमोर आला होता. एवढ्या रात्री दवाखाना समोर काय करत आहे. असे इंद्रभान पाटील हे बोलले. याचा राग आल्याने शुभम चौधरी यांनी वाचमन इंद्रभान पाटील यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हातातील काठी हिसकावून त्याच काठीने त्यांना मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या वाचमन इंद्रभान पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर याबाबत बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी शुभम ज्ञानेश्वर चौधरी रा. पाळधी ता. जामनेर याचा विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound