चाळीसगावात मेडिकल व्यावसायिकाची जबरी लूट!

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका मेडिकल व्यावसायिकाचा पाठलाग करून व त्याच्या एक्टिवा अडवून अज्ञात चौघांनी जबरी लूट केल्याची थरारक घटना शांतीनगरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शांतीनगरातील संजय हशमतराम मंदानी (वय-४४) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. मेडिकल व्यावसाय करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत असतात. दरम्यान काल रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गेल्या ८ ते १० दिवसांपासून विक्री व उधारीचे जमा झालेली अंदाजे रक्कम २ लाख ६५ हजार रुपये मंदानी यांनी आपल्या बॅगेत घालून घराकडे ॲक्टिवाने (क्र. एम.एच. १९ डीएल ७२५४) घरी निघाले. मात्र मंदानी हे घरापर्यंत आले असताना मागून पाठलाग करत दोन दुचाकी आल्या. एकाने समोरून अडवली. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन जणांनी मंदानी यांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळील बॅक हिसकावून नेली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान याप्रकरणी मंदानी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content