जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा उपलब्ध असल्याने शहरात नऊ तर जिल्ह्यात एकूण ३० ठिकाणी लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली आहे.
आजसाठी शहरात शासकीय केंद्रासाठी ४ हजार ६६० कोविशिल्ड तर खासगी केंद्राकडे २६८० कोव्हॅक्सिन लसींचा साठा शिल्लक आहे. महापालिकेच्या नऊ केंद्रांपैकी नानीबाई रुग्णालय वगळता उर्वरित आठ केंद्रांवर शुक्रवारी लसीकरण होणार आहे. यात पुढीलप्रमाणे साठा उपलब्ध आहे-जळगाव सामान्य रुग्णालय ३,७६०, जामनेर २१०, चोपडा ६०, मुक्ताईनगर ८०, बारोळा ७०, रावेर २७०, यावल १०० कोविशील्ड, भडगाव १०० कोव्हॅक्सिन, बोदवड १२० कोविशील्ड, एरंडोल ६०, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन प्रत्येकी १००, धरणगाव १९०, शाहु हास्पिटल १९००, पिंपळगाव १००, पहूर ८०, झामी चौक अमळनेर ३००, न्हावी २००, सावदा ३०० कोविशील्ड व १०० कोव्हॅक्सिन, वरणगाव १०० कोव्हॅक्सिन, मेहुणबारे १०० कोविशील्ड, एनयूएचएम पाचोरा १०, शिरसगाव १०, गारखेडा ३०, शेंदुर्णी २०, अंतुर्ली ६०, उचंदा ४०, चिनावल २०, लोहारा ३०, साकळी १० व जळगाव शहरातील विश्वप्रभा खासगी केंद्र २,६८० कोव्हॅक्सिन लसीचे डोस शिल्लक आहेत.
यामुळे शुक्रवार दिनांक २८ मे रोजी जिल्ह्यातील ३० केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.