वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन वाहने जप्त; जिल्हापेठ पोलीसात सहा जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन वाहनांवर जिल्हापेठ पोलीसांनी कारवाई केली असून तीनही वाहने मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय महामार्गावरील एन.एन. वाईन शॉपसमोरून पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच ०४ एएल ८७६८) यात बेकायदेशीर वाळू भरून वाहतूक करत असतांना पोलीसांनी पकडले. याप्रकरणी पो.कॉ. अमित कुमार मराठे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक स्वप्नील पुंडलीक नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव आणि मालक ज्ञानेश्वर दिनकर बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा या दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दुसऱ्या कारवाईत शहरातील पिंप्राळा रोडवरील मानराज पार्कजवळ जिल्हापेठ पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना (एमएच १९ झेड ५७६२) या क्रमांच्या ट्रकमध्ये वाळू भरून वाहतूक करतांना पोलीसांनी मंगळवारी २२ मार्च रोजी पहाटे ४ वाजता कारवाई केली. यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमित ठाकरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक विठ्ठल रामसिंग सोनवणे व गुलाब भिमराव नन्नवरे दोघे रा. बांभोरी ता. धरणगाव यांच्यावर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आणि तिसऱ्या कारवाईत शिवकॉलनी स्टॉपवरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ५८५२) या क्रमांकाचे ट्रॅक्टर जिल्हापेठ पोलीसांनी मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी ५ पकडले. याप्रकरणी पोलीस नाईक जुबेर तडवी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक जगदीश ज्ञानेश्वर कोळी आणि दिपक दिलीप तायडे दोन्ही रा. विरोदा ता. यावल यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी पोहेकॉ. फिरोज तडवी, जुबेर तडवी आणि पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!