Gambling : शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; तिघे पोलीसांच्या ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी रस्त्यावरील पाचनदेवी मंदिरासमोरील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दुपारी धाड टाकून रोकडसह सहा दुचाकी हस्तगत केले आहे. या कारवाईत तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मोहाडी रोडवरील पाचनदेवी मंदिरासमोरील शेतात काहीजण जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल चौधरी, पोहेकॉ प्रविण पाटील, सचिन विसपूते, पोकॉ भरत डोके, अजय पाटील आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोउनि निलेश गोसावी, सचिन मुंढे, पोना समाधान टहाकळे, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन ढवळे यांनी संयुक्तपणे सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमार छापा टाकला. यात पोलीसांनी पाहून काही जुगार खेळणारे फारार झाले. तर तीन जणांना जागेवरच पकडले.

 

गजानन समाधान हटकर (वय-३५) रा.तांबापुरा, शरीफ लोहार गुलमोहम्मद (वय-४९), रा.गेंदालाल मिल, संतोष चुडामण चव्हाण (वय-५२) रा. सामनेर ता.पाचोरा या तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, १३ हजार ५०० रूपयांची रोकड आणि ६ दुचाकी हस्तगत केले आहे.  तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content