महापालिकेचा निष्काळजीपणा – आमदारांनी स्वतः केली साफसफाई (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व आमदार राजूमामा भोळे जमले असता त्यांना महात्मा फुले यांच्या पुतळ्याची व परिसराची महापालिकेकडून साफसफाई करण्यात आली नसल्याचे आढळून आले. महापालिकेचा निष्काळजीपणापाहून त्यांनी संताप व्यक्त करत स्वतः साफसफाई करत माल्यार्पण करून अभिवादन केले.

 

आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त फुले मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची साफसफाई देखील करण्यात आली नसल्याचे आज सकाळी उघडकीस आले. यामुळे पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी दुर्लक्ष केले असून याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सरीताताई नेरकर यांनी केली. यावेळी महापालिके विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे यांनी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह आंदोलकांना समर्थन देत या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तर यानंतर आमदार भोळे यांच्यासह उपस्थित आंदोलकांनी या पुतळ्याची साफसफाई केली. यावेळी संविधान जागर समितीचे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह हरिचंद्र सोनवणे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, निलू इंगळे, दिलीप सपकाळे, वाल्मीक सपकाळे, मिलिन तायडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक राजेंद्र मराठे, महानगर सचिव प्रा. भगतसिंग निकम सर, ज्योतीताई निंभोरे, वंदनाताई पाटील, प्रकाश पंडित, धिरज वर्मा, जयश भावसार, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर तायडे आदी उपस्थितांनी साफसफाई केली. यानंतर आ. राजूमामा भोळे, सारीताताई नेरकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः पुतळ्याची पाण्याने धुवून सफाई केली. जळगाव महापालिका आपले कर्तव्य बजाविण्यात कमी पडत असल्याने त्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.

 

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1908140549385122

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2095079107326399

Protected Content