गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च MBA महाविद्यालयात आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया फालक यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी यावेळी महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती दिली. समाजातील विषमता, अनिष्ट रूढी-परंपरा, यांसारख्या समाजविघातक चालीरितींना विरोध करून, सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी सतत कार्य करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले हे समाजासाठी कायमच आदर्श आहेत. आपल्या कार्यातून शिक्षण हाच यशाचा मूलमंत्र आहे असा संदेश समाजाला दिला आहे. महाविद्यालयातील प्रा. प्राजक्ता पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. BCA च्या प्रथम वर्षातील भूमिका नाले या विद्यार्थिनीने आभारप्रदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content