आमदारांची वन विभाग व वीज वितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात आणि रात्रीची लोड शेडींग कमी करण्यासंदर्भात आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची सोमवारी शासकीय विश्रागृहावर वन विभागाचे अधिकारी, वीज वितरणचे अधिकारी यांची बैठक झाली.

मुक्ताईनगर तालक्यातील घोडसगाव, चिखली, तरोडा, रुईखेडा, कुंड, दुई, सुकळी, डोलारखेडा, चिचखेडा, टाकळी, वायला, निमखेडी बु, ईछापुर, निमखेडी, चारठाना आदी. प्रमूख गावांसह इतर असंख्य गावेही वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र हद्दीत येत असल्याने सदरील गावांचं शेत शिवार हे या अंतर्गत व या शेतात जाणारी शेतरस्तेही जंगलालगत येत असल्याने बळीराजाला बागायती शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते.

गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा मुक्त संचार या भागात वाढल्याने अनेक शेतकरी, शेतमजूर यांच्यावर वन्यप्राण्यांनी प्राण घातक हल्ला, तसेच अनेक शेतकऱ्यांचे पशुधन जीव ठार मारल्याच्या घटना घडल्या असून अजूनही अधून मधून असले हल्ले होतच राहतात. त्यातच रात्रीची लोड शेडींग यामुळे शेतकरी राजा प्रचंड हवालदिलं झाला आहे.

यासंदर्भात शेतकरी बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोमवारी शासकीय विश्रागृहावर वन विभागाचे अधिकारी, वीज वितरणचे अधिकारी यांची बैठक घेवून यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशा वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. घोडसगाव येथील शेतकरी रामा कोळी यांचे गायीला बिबट्याने ठार केल्या संदर्भात वनअधिकारी यांना स्थळ पंचनामा करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. रात्रीच्या लोडशेडींग तात्काळ थांबविण्यासंदर्भात विज वितरणच्या अधिकाऱ्यांना देखील सूचित केले. वनविभागामार्फत भूजल संधारणासाठी तरतुद असलेल्या व रोहयोअंतर्गत काम होणार्‍या सीसीटी (सलग समतल चर) च्या कामासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना केल्या; जेणेकरुन जंगलातील भूजल संधारण होऊन सखल भागात वाहणार्‍या नाले, ओढे, झरे यांना ऊन्हाळा संपेपर्यंत पाझर राहून वन्य प्राण्यांना आवश्यक नैसर्गिक पाणवठे जिवंत राहतील व वन्यजीव संरक्षण होईल व रोजगार निर्मीतीही होईल. तसेच वन्य जीवांचे शेती शिवारातीर वावर कमी होईल.

यावेळी डी.एफ.ओ हाऊसींग, आर एफ ओ बच्छाव, वनपाल पी.टीपाटील तसेच शिवसेना ता.प्रमुख छोटु भोई, अल्पसंख्यांक जि.प्रमुख अफसर खान, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे कोळी, उप विभागप्रमुख गोलु मुर्‍हे, घोडसगावचे प्रदीप कोल्हे, शेतकरी रामा कोळी, संजय पोटदुखे, सारंग पटेल, क्रीष्णा पटेल, अरुण जावरे, भागवत दांडगे, सतिष वाघ, अनिल पटेल, जितेंद्र दांडगे यांची उपस्थिती होती.

Protected Content