जळगाव नगरीचे शिल्पकार ‘सुरेशदादा जैन’!

आज आपल्या सर्वांना दिसत असलेले जळगाव शहर पूर्वी फार वेगळे होते. ७० ते ९० च्या दशकात गुंडगिरी, बेरोजगारीचे प्रमाण देखील फार होते. जळगावच्या समाजकारणात तेव्हा एक चेहरा पुढे आला ज्याने जळगावचे चित्र पालटले तो चेहरा म्हणजे सुरेशदादा जैन. शहरातील झोपडपट्टी हटावपासून व्यापारी संकुलांच्या निर्मितीपर्यंत सर्वच ठिकाणी सुरेशदादांनी पुढाकार घेतला. आजच्या तरुण पिढीला सुरेशदादांचे कष्ट, परिश्रम, तळमळ ठाऊक नसली तरी जळगावचे जुने खोड दादांना चांगलेच ओळखतात आणि मानतात सुद्धा.

आमचा सुरेशदादांशी केवळ ७ वर्षांचा परिचय. आमचा परिचय थोडका असला तरी आम्ही ओळ्खलेले दादा म्हणजे ग्रेट माणूस. आमचा जेष्ठ आधारस्तंभ असलेले सुरेशदादा आम्ही दोन्ही भावांना नावाने ओळखतात. इतकंच काय तर आम्ही कोणताही शब्द टाकला तर ते त्याला नकार देत नाही. केव्हाही भेट घेतली तर प्रेमाचे दोन शब्द आणि मोलाचा सल्ला ठरलेलाच असतो. सुरेशदादांचा आज दि.२२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांचे अभिष्टचिंतन. जळगाव शहरावर अनंत उपकार केलेल्या दादांच्या कार्याची माहिती द्यायचे झाल्यास आज मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातून अनेकांना मिळालेला रोजगार, रोज होत असलेली करोडोंची उलाढाल, मनपाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने उभारलेले वाघूर धरण, सर्वात उंच महानगरपालिका, झोपडपट्टी मुक्त मुख्य परिसर, गुंडगिरी, टोळी युद्धातून दूर असलेले जळगाव शहर सुरेशदादांचीच देण आहे.

सुरेशदादांना जे जवळून ओळखतात त्यांनाच माहिती दादांचा दानशूरपणा आणि देण्याची कर्णासारखी वृत्ती. सुरेशदादांनी आजवर अनेकांना मोठे केले, कितीतरी गरजूंना मदत केली, शिष्यवृत्ती उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आज स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. सुरेशदादांनी कधीही आपल्या कार्याचा उदोउदो केला नाही. समाजा-समाजात, माणसा-माणसात भेदभाव न करणाऱ्या सुरेशदादांना जनतेने समाज चिंतामणीची उपमा दिली. सुरेशदादांकडे जो गेला तो कधीही निराश होऊन परतला नाही. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेशदादांना ईश्वर निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना. आयुष-पियुष मणियारकडून सुरेशदादांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!

शुभेच्छुक !

(आयुष-पियुष मणियार)

Protected Content