भाजप कार्यालयाच्या दारात कचरा जाळला

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठ परिसरातील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या दरवाजा जवळ काळ रात्री अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .

नेहमीप्रमाणे दररोज सकाळी कार्यालय उघडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली . अगदी दरवाजात आणून कचरा जाळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही हि माहिती देण्यात आली . त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या कार्यालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली . त्यांनी पोलिसांना सूचना दिल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका मनोरुग्ण संशयिताला ताब्यात घेतले आहे .

काही दिवसांपूर्वी या कार्यालयात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना एका मनोरुग्णाने थेट बैठकीत प्रवेश काऊ आरडाओरड केली होती . त्यानंतर आज हा प्रकार घडला . ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या नंतरच्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडीनंतर घडत असलेल्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

Protected Content