दिवंगत निखिल खडसे यांना जयंती दिनी अभिवादन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत निखील एकनाथराव खडसे यांना त्यांच्या जयंती दिनी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी परिसरातील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.निखील खडसे यांच्या जयंती निमित्ताने स्मृतीस्थळ आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते स्व. निखिल खडसे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा.सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील, दशरथ कांडेलकर, राजू माळी, ईश्‍वर रहाणे, पांडुरंग नाफडे, सूतगिरणीचे उपाध्यक्ष संजय चौधरी, पं.स. सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, विनोद सोनवणे, पियुष महाजन, प्रवीण पाटील, सुनील काटे, नीलेश शिरसाट, ललित महाजन, बापू ससाणे, आसिफ बागवान आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपले बंधू दिवंगत निखील खडसे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, मुक्ताई सूतगिरणीचे काम पूर्णत्वास जाऊन सूतगिरणी सुरू व्हावी व स्थानिक युवकांना, महिलांना रोजगार मिळावा हे निखिल भाऊंचे स्वप्न होते. त्यासाठी ते सूतगिरणीचे चेअरमन झाल्यावर त्यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. परंतु काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्या नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले. आज सूतगिरणी सुरू असून सुमारे २५० युवक, महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे रोहिणीताई खडसे यांनी नमूद केले.

दरम्यान, दिवंगत निखील खडसे यांच्या जयंती दिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Protected Content