रूईखेडा येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रुईखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रुईखेडा गावी येथील राजाराम गणू लोखंडे यांच्या घराच्या मोकळ्या जागेमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार बुधवार १६ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून सुमारे १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र विठ्ठल धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील विलास वराडे (वय-३५), गजानन त्र्यंबक वराडे (वय-४५), अनिल शामराव लोखंडे  (वय-४१), गोपाळ सोपान पाटील (वय-३५), राजाराम गणू लोखंडे (वय-५८), शोक रमा सरोदे (वय-६०) आणि शालिक सलीम वंजारी वंजारी (वय-३२) सर्व रा. रुईखेडा ता.मुक्ताईनगर यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.

Protected Content