विद्यापीठात विविध प्राधिकरणाच्या निवडणूकांसाठी निवडणूक कक्ष गठीत

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या आगामी निवडणूकांसाठी विद्यापीठात निवडणूक कक्ष गठीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ६२ नुसार विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे गठन दि.३१ ऑगस्ट,२०२२ पूर्वी आवश्यक आहे. सद्याच्या प्राधिकरणांचा कार्यकाळ हा दि.३१ ऑगस्ट, २०२२ रोजी संपुष्टात येत आहे.

या नवीन प्राधिकरणांच्या निवडणूका लक्षात घेता कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी निवडणूक कक्ष स्थापन केला असून या निवडणूक शाखेचा कार्यभार उपकुलसचिव (विधी / माहितीचा अधिकार) डॉ. एस.आर. भादलीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सोमवार दि. २१ मार्च पासून निवडणूक शाखेचे कामकाज सुरु होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ. पवार यांनी दिली.

Protected Content