रायसोनी महाविध्यालयात धुळवडीच्या सप्तरंगात न्हाली तरुणाई

जळगाव- लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी व प्राध्यापकांनीही होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. होळीच्या दिवशी महाविद्यालय सुरू असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला रंगवायचे याच इराद्याने आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात होळीचा जल्लोष सुरु होता. यावेळी लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन होळी रे होळीचा आवाज परिसरात घुमला.

पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यावर या ठिकानी भर देण्यात आला. पाणी टंचाईचा प्रश्‍न उन्हाळ्यात निर्माण होत पाणी न वापरता कोरड्या नैसर्गिक रंगाची वापर करत रंगपंचमी साजरी करण्यात आली. सप्तरंगांची उधळण करत रायसोनी महाविद्यालय परिसर गजबजला होता. मुलींच्या वसतिगृहात सप्तसुरांच्या तालावर मुक्तपणे रंगाची उधळण सुरू होती. या उत्सवात प्राध्यापकासह इतर सहकारी सहभागी झाले.

Protected Content