कॉंग्रेसचा रविवारी यावल येथे शेतकरी मेळावा

 

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायद्याविरोधात विरोधात व आंदोलनकर्ते शेतकरी यांना पाठींबा देण्यासाठी रविवार ७ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष  आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे  शेतकरी मेळावा रविवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. शेतकी संघ यावल येथे आयोजित करण्यात आला आहे.  प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. संदिप भैय्या पाटील व  प्रमुख उपस्थित माजी आमदार रमेश दादा चौधरी, कॉंग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, गटनेते जिल्हा परिषद तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस प्रभाकर अप्पा सोनवणे, इंटक जळगाव जिल्हा अध्यक्ष भगतसिंग बापु पाटील, जिल्हा परिषद सदस्य आर. जी. नाना पाटील,  लिलाधर माजी सभापती यावल पंचायत समिती विश्वनाथ चौधरी, पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील, उमाकांत आबा पाटील, नितिन व्यंकट चौधरी, गटनेते यावल नगर परिषद सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगर परिषद फैजपूर गटनेते कलीम खान मनयार, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, कलीमा सायबु तडवी, केतन किरगे , जावेद जनाब,  शिवराम शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये हा मेळावा होणार आहे  तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जि प सदस्य, प.स.सदस्य,सरपंच ,नगरसेवक विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावल काँग्रेस कमिटी  अध्यक्ष कदीर खान, फैजपूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख रियाज यांनी केले आहे. 

 

Protected Content