मुक्ताईनगर येथे चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातच फळे व भाजी विक्री !(व्हिडिओ)

मुक्ताईनगर, पंकज कपले । सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांमध्ये चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातच कांदा, बटाटे, मिरची, कोथंबीर, आंबे आदींची जोरजोरात ओरडून विक्री करण्यात आल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अर्थात, बहुजन मुक्ती मोर्चाने आज हे अनोखे आंदोलन करून परिसरात उपस्थित असणार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.

सविस्तर वृत्त असे कि, शेतकऱ्यांना ५० %जुन्या दरापेक्षा कमी दराने रासायनिक खते व बी बियाणे वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे आणि भाजीपाला, फळभाज्या व फळे,शेतीची आवश्यक वस्तुंची दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात योग्य ते व्यवस्थापन करुन देणे या संदर्भात आज शनिवार  दि २९ मे  रोजी संपुर्ण राज्यभरामध्ये बहुजन मुक्ति पार्टी तर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. राज्यभराप्रमाणे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून मुक्ताईनगर येथे सूद्धा तहसील आवारात हे आंदोलन यशस्वीरित्या  करण्यात आले. याप्रसंगी बहुजन मुक्ति पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाल्याची दूकाने तहसील आवारात मांडुन भाजीपाला तहसील कार्यालयात आणुन टाकला.  शेतकऱ्यांचा  हितामध्ये घोषणा देण्यात आल्या.बहुजन मुक्ति पार्टी रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे  यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. , मागण्या पूर्ण न झाल्यास,  शेतकऱ्यांच्या  हिताचे निर्णय न घेतल्यास, लाॅकडाउनचे अयोग्य निर्बंध न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रमोद सौंदळे यांनी तहसीलदार व .पोलिस निरीक्षक पवार  यांचे समोर प्रशासनास दिला. आंदोलन यशस्वितेसाठी  बहुजन मुक्ति पार्टीचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल इंगळे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष रमेश बोदडे,.राजु वानखेडे, मुस्लिम मणियार बिरादरीचे जळगाव जिल्हाध्यक्ष  हकिम चौधरी ,शेख कलीम शेख मणियार, सिद्धार्थ हिरोळे व संध्या हिरोळे या आदींनी मेहनत घेतली. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1147604195745420

 

Protected Content