मध्य प्रदेशातील भाजपा आमदार कोरोना पॉझिटिव्ह !

भोपाळ (वृत्तसंस्था) राज्य सभेच्या मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे.

 

देशभरात काल राज्यसभेच्या 19 जागांवर काल मतदान घेण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही राज्यसभेच्या तीन जागांवर मतदान झाले. या मतदानासाठी पटनामध्ये आलेले भाजपाचे जावद मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश सकलेचा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. सकलेचा यांनी गुरुवारी त्यांच्या पत्नीला ताप आल्यामुळे दोघांचीही चाचणी भोपाळच्या एका खासगी लॅबमध्ये केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याच दिवशी राज्यसभेचे मतदान झाले. राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांच्या संपर्कात कोणकोण आमदार, पक्षाचे पदाधिकारी आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे.

Protected Content