बलात्काराच्या धमक्या ; हसीना जहाँची न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।  भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीना जहाँने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त हिंदू समाजाला सोशल मीडियावर सदिच्छा दिल्यापासून अज्ञात लोकांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे कारण तिने सुरक्षा मागताना सांगितले आहे

हसीनाने न्यायालयाकडे याचिका दाखल करून अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. काही वर्षांपासून हसीना आणि शमी यांच्यात वाद सुरू असेल्यामुळे ते वेगवेगळे राहतात. हसीना तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

हसीनाने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हसीनाने स्वत:साठी आणि मुलीसाठी सुरक्षा मागितली आहे. हसीनाने आरोप केला आहे की ९ ऑगस्ट रोजी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही.

Protected Content