मू. जे. महाविद्यालयात आंतर विभागीय क्रिकेट (पुरुष) स्पर्धा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय क्रिकेट (पुरुष) स्पर्धा २०२२-२३, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दि. ०७ ते १२ डिसेंबर २०२२ दरम्यान मू. जे. महाविद्यालयाव्दारे आयोजित करण्यात आल्या.

सदर स्पर्धेत जळगांव, नंदुरबार, एरंडोल व धुळे विभागाच्या पुरुष संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा हि विद्यापीठाच्या नियमानुसार घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, मू. जे. महाविद्यालय जिमखान्याचे चेअरमन डॉ. सी.पी.लभाने, एम. एम. लीधुरे, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व जळगांव क्रीडा विभागाचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सह-सचिव डॉ. पी.आर. चौधरी, नंदुरबार विभागाचे प्रा. डॉ. तारक दास, डॉ. सचिन झोपे, डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय, व डॉ. जुगलकिशोर दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत जळगांव विभागाने सरस कामगिरी करत तीनही सामन्यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यात मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यात तनेश जैन व संघाचा कर्णधार संकेत पांडे यांनी प्रत्येकी ०३ विकेट्स घेतल्या. तसेच विजयाकरिता आवश्यक असलेली धावसंखेचा पाठलाग करत पियुष सोहाने याने अर्धशतकीय (५५ नाबाद) खेळी करत संघास विजय मिळवून दिला. स्पर्धेत नंदुरबार विभाग उपविजेता ठरला. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून निलेश बोरीकर व राहुल कोळी यांनी काम पहिले तसेच स्कोरर म्हणून हितेंद्र चव्हाण व निखील कुंभार यांनी काम पहिले.सदर स्पर्धा ह्या मू. जे. महाविद्यालायचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

 

 

Protected Content