येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात महाप्रसाद सोहळा संपन्न (व्हिडीओ)

खामगाव – अमोल सराफ | बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीमध्ये शिव खंडोबा यांच्या मागील ३५  वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेच्या महाप्रसादाचा मुख्य दिवस होता.

 

सप्तऋषीस मनी मल्हासूर गाजले भारी ।

म्हणूनी अष्टभैरव मार्तंड अवतार धरी ।।

बानाईच्या तपाने देव मल्हारी झाले प्रसन्न खामगांव नगरी नंगर ठरला यावे वाघे ज भवसिंधू हा पार कराया कलीयुगी साधन ।

विसरू नको मानवा मार्तंड चरणी लावी मन ||

 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीमध्ये शिव खंडोबा यांच्या मागील ३५  वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेच्या महाप्रसादाचा मुख्य दिवस होता. आज येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये भव्य असा महाप्रसादाचा सोहळा खंडोबा मित्र मंडळाच्या मागील ३५ वर्षाच्या परंपरेनुसार आज पार पडला. अत्यंत शिस्तबद्ध हा महाप्रसाद डोळ्याचा पारण फेडणारा ठरतो. यामध्ये १३ क्विंटल पोळी ,७ क्विंटल बुंदी, दहा क्विंटलची भाजी व १००० लिटर ताकाची कडी , ५ क्विंटलचा भात,  पाच क्विंटलची शेव असे जवळपास महाप्रसादाचे आयोजन आणि याचा लाभ तब्बल दहा ते वीस हजार भाविक रात्री नऊ वाजेपर्यंत अखंडित घेत असतात.  या महाप्रसादाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होत असते.  तर काय आहे कसा पार पडतो कशी होती तयारी याचा ग्राउंड रिपोर्ट लाईव्ह ट्रेंड्स न्यूजवर.

 

 

Protected Content