भाजप खासदार रवि किशन यांच्यावर जया बच्चन खवळल्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी केलाय. बॉलिवूडवर केल्या जाणाऱ्या आरोपांदरम्यान मंगळवारी शून्यकाळात जया बच्चन यांनी सरकारकडे हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभं राहण्याची विनंती केली. ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ‘सिने उद्योगाला बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रा’संबंधी राज्यसभेत शून्यकाळ नोटीस दिली होती. याविषयी सदनात त्यांनी म्हणणं मांडलं. ‘जेव्हाही देशात एखादी समस्या येते, त्यावेळी बॉलिवूडचेच लोक सर्वात आधी मदतीसाठी पुढे येतात. सिनेसृष्टीची प्रतिमा डागाळताना पाहून पीडा होत असल्याचं’ जया बच्चन यांनी भावूक होत म्हटलं. ‘सिनेसृष्टीशी संबंधितत एका कलाकारानंच संसदेत उद्योगाविरुद्ध मतं मांडली आहेत. हे निंदनीय आहे’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या रवी किशन यांच्यावर निशाणा साधला.

लोकसभेत सोमवारी ‘बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर’ या मुद्यावरही चर्चा झाली. भाजप खासदार रवी किशन यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि चौकशीची मागणी केली. यावरून जया बच्चन यांनी त्यांचं नाव न घेता ‘लोग जिस थाली में खाते हैं उसमें ही छेद कर रहे’ असं म्हणतानाच ‘काही लोकांमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देता येणार नाही’ असंही सुनावलं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ कडून चौकशी सुरू आहे. ड्रग्ज संबंधी अनेक सिनेकलाकारांची नावं समोर आली आहेत. ‘

Protected Content