विद्युत पारेषण कंपनीच्या धोरणामुळे खासगी सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 07 15 at 8.55.57 PM

भुसावळ (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या विभागातील खाजगी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याने या खाजगी सुरक्षा रक्षकांना उपासमारीची वेळ आली आहे. नव्या कंपनीला हा ठेका मिळेल त्यात जुन्या सुरक्षारक्षकांना समाविष्ट करून घ्याव्या अशी मागणी सुरक्षारक्षकांनी भुसावळ खडका येथील अधीक्षक अभियंता एम.आर.पाटील यांना निवेदयाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या विभागात गेल्या तेरा वर्षापासून खाजगी एजन्सीच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षक काम करत होते. गेल्या 30 जूनपासून या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. एजन्सीचा करार संपल्याने कामावरून कमी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, ज्या नव्या कंपनीला हा ठेका मिळेल त्यात जुन्या सुरक्षारक्षकांना समाविष्ट करून घ्याव्या अशी मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे. याबाबत सुरक्षारक्षकांनी भुसावळ खडका येथील अधीक्षक अभियंता एम.आर.पाटील यांना निवेदन देऊन बोर्ड गार्ड चा निषेध केला.

 

Protected Content