मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण द्या; विविध संघटनांची मागणी

यावल प्रतिनिधी । मराठा, मुस्लिम व धनगर समाला आरक्षण मिळावे यासाठी किनगाव येथे पीआरपी व संविधान आर्मीसह विविध संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 

यावेळी पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी जगन सोनवणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचीका दाखल करावी, मोदी सरकारने संसदेत कायदा पारीत करून केंद्र सरकारने राष्ट्रपती महामहिमांच्या स्वाक्षरीने मराठा समाजाला न्याय द्यावा. मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला ही आरक्षण द्यावे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेवर बंदी घालावी. कारण अभिनेत्री बबिताने मेहतर समाजाचा जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन आपमान केल्याप्रकरणी ॲस्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करावा. 

कोळी समाजाला जाती प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे या मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह मुंबईला सुद्धा लॉकडाऊन उठल्यावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी घोषणा नेते जगनभाई सोनवणे यांनी केली. यावेळी पीआरपीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, यावल तालुकाप्रमुख राहुल साळुंके, पी.आर.पी.जिल्हाउपाध्यक्ष रतन वानखेडे, युवा तालुकाध्यक्ष नाना साळुंके, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह  किनगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य बबलु कोळी, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख हरीष सुरवाडे, किनगाव खुर्दचे सरपंच भुषण नंदन पाटील, किनगाव बुद्रुकचे सरपंचपती संजय पाटील, उपसरपंच अनिल रामराव पाटील, संविधान आर्मीचे रावेर तालुका प्रमुख चंदु भागेस्वर,  माजी ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळवे, अनिल भोई, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

Protected Content