वृध्द महिलेचे बंद घर फोडून १ लाख ६२ हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील प्रेरणा नगर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिेन असा एकुण १ लाख ६२ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आले आहेत. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव भुसावळ शहरातील प्रेरणा नगर येथे चित्रा लाला सोनार वय-६४ या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांनी घर बंद करून नातेवाईकांकडे गावाला गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत दीड लाख रुपयांची रोकड आणि १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. दरम्यान घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चित्रा सोनार यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव देऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content