कंपनीत मुद्देमालाची कामगारांकडून चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील स्पेस्ट्रम कंपनीतून ९ हजार रूपये किंमतीचे १० किलो तांब्याचे तुकडे चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीला आले आहे. ही चोरी कंपनीतील काम करणाऱ्या दोघांनी केल्याचे समोर आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीत ईलेक्ट्रीक वायर बनविले जाते. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कंपनीत काम करणारे कामगार सुरेश ओंकार वाघ रा. पंढरपूर नगर, जळगाव आणि सोनुसिंग रमेश राठोड रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हे कामावर होते. त्यांनी वायर बनविल्यानंतर वेस्ट म्हणून निघालेले तांब्याचे तुकडे चोरून नेले. हा प्रकार कंपनीच्या सुपरवायझर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोघांनी मिळून एकुण ९ हजार रूपये किंमतीचे १० किलो तांब्याचे तुकडे चोरून नेल्याचे उघडकीला आले.

या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी चंदन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुरेश ओंकार वाघ रा. पंढरपूर नगर, जळगाव आणि सोनुसिंग रमेश राठोड रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर सावळे हे करीत आहे.

Protected Content