धावत्या रेल्वे खाली आल्याने अनोळखी प्रौढाचा मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेल्वे खंबा क्रमांक ४७६ च्या १२ ते १४ जवळ धावत्या रेल्वेखाली अनोळखी ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ५ मिनीटांनी घडली. याबाबत लोकोपायलट यांनी रावेर पोलीसात घटनेची माहिती दिली. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून रावेर रूग्णालयात हलविण्यात आले. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रावेर पोलीसांनी केले आहे. याचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content