लहान मुलांच्या भांडणावरून एकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील गोठ्याजवळ लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हुसेन बिस्मील्ला पटेल (वय-५५) रा. भादली बुद्रुक ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. आठ महिन्यांपुर्वी गावात लहान मुलांचे भांडण झाले होते. याचा राग मनात ठेवून गावात राहणारा हेमंत भास्कर कोळी याने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील गोठ्याजवळ हुसेन पटेल याचा रस्ता आडविला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी  बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे करीत आहे.

Protected Content