नशिराबाद येथे शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी अभियानाला सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शहरप्रमुख विकास धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार १३ ऑक्टोबर रेाजी मतदार नोंदणी अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे.

नशिराबाद येथील बसस्थानक परिसरातील शिवसेना संपर्क कार्यालयात आज बुधवार १३ ऑक्टोबर रोजी शिवसेना आणि युवा सेना च्यावतीने नशिराबादकरांसाठी नाव नोंदणी अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, तालुकाप्रमुख दगडू माळी, चंद्रकांत भोळे, युवासेनेचे शाखाप्रमुख चेतन बर्‍हाटे, संदीप पाटील, भूषण कोल्हे, कैलास नेरकर, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखे, प्रभाकर महाजन, उल्हास चौधरी आदी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह शिवसेना संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना व युवासेनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!