कंपनीची फसवणूक : न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका खाजगी फायनान्स कंपनीचे घेतलेल्या कर्जा पैक्की २ लाख ३९ हजार रूपये अधिक थकबाकी असतांना परस्पर शेत विक्री करून जळगाव फायनान्स कंपनीची फसवणुक करणाऱ्या ६ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील राहणारे एकनाथ दगडु कंखरे, हंसराज अशोक महाजन, संतोष रतन चौधरी, राजेश कोलते, राजु वामन धनगर आणि स्वाती किरण चौधरी यांनी मिळून जळगाव येथील एका खाजगी अॅग्रो कमर्शियल फायनान्स कंपनीकडून शेत गट हे कुणालाही फायनान्स कंपनीस तारण गहाणखत ची हमी करून दिली . असे असतांना कंपनीची पुर्व तारण गहाण ठेवुन त्रयस्त व्यक्तीस खरेदीने तबधील करून दिले आहे. या सर्व मंडळीवर फायनान्स कंपनीचे २ लाख ३९ हजार रूपये कर्जाचे थकबाकीदार असतांना ऑग्रो कमर्शियल फायनान्स कंपनीची पुर्व परवानगी न घेता शेत गट क्रमांक यातील १ हेक्टर ५५ आर क्षेत्रफळाची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी या सहा जणांविरूद्ध यावल न्यायालयाच्या आदेशान्वये सिआरपीसी१५६प्रमाणे ( ३ ) कागदपत्रे प्राप्त झाल्याने भादवी कलम ४o६, ४१८ , ४२० , ४६५ , ३४ प्रमाणे कंपनीचे नितिन मधुकर पाटील (वय-४०) यांच्या तक्रारी वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.

Protected Content