राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा सन्मान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणारे 25 जलतरणपटू, अथलेटि खेळाडू आणि प्रशिक्षकांचा पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित यांचे हस्ते प्रशिक्षक कमलेश नगरकर, संदीप भगवान पाटील, जलतरणपटू भुषण सपकाळे, कमलेश पाटील, धनश्री जाधव, अमेय नगरकर, भूपती चौधरी, कविता पाटील यांचेसह 25 खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले यात एक दिवस पोलीस जलतरणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकवतील अशी अपक्षा व्यक्त करत खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित माळी यांनी तर सहा पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. यावेळी जयंत चौधरी, सुरेश राजपूत, सतीश देसले यांचेसह खेळाडू, पालक व नागरीक उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉल येथे हा सोहळा संपन्न झाला.

Protected Content