संस्कारीत कार्यकर्ते असले तर सहकार चळवळ यशस्वी होते- बन्सीलाल अंधोरे

जळगाव, प्रतिनिधी | सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असले तर सहकार चळवळ यशस्वी होते असे प्रतिपादन जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक बन्सीलाल आंधोरे यांनी केले. ते सहकार भारती व मनहर भाई मेहता पतसंस्थेचे संचालक व महासंघाचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

 

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात दि. २९ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत सहकार भारतीचे वतीने सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. बन्सीलाल आंधोरे यांनी पुढे सांगितले की, सहकाराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी असते त्यातुन सुदृढ समाज उभा राहतो. समाजाच्या आर्थिक गरजांचे वेळी अडीअडचणीच्या वेळी सहकाराच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होते व गरजा भगविल्या जातात. शेती, उद्योगाची उभारणी यांच्या भरभराटीमध्ये सहकाराचा खुप मोठा वाटा आहे, सहकार जगला पाहिजे यासाठी प्रामाणिक, होतकरू, संस्कारीत. कार्यकर्ते यांनी पुढे आले पाहिजे.याप्रसंगी महासंघाचे प्रदेश पदाधिकारी सुभाष जी भावसार, सुरेशचंद्रजी सोनार, मनहर भाई मेहता पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विश्वास कुलकर्णी महासंघाचे कार्यकर्ते हरी भाऊ वलकर, सचिन लाड वंजारी, महेंद्र कोळी, दिपक घोगरे, शशी सोनवणे, रामचंद्र भाऊ वंजारी, किशोर वंजारी,पंकज भावसार , पंकज सोनवणे, जितेंद्र पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content