लाच घेणार्‍या शिपायाला पोलीस कोठडी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरी लावून देण्याचे सांगत तीस हजाराची लाच घेणाऱ्या शिपायाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोपाळ कडू चौधरी (वय-५५, रा. डीएनसी कॉलेज) संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला ३० हजारांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले होते.

याविषयी अधिक माहिती अशी की, ‘सुशिक्षीत ३५ वर्षीय बेरोजगार तरुणाला जिल्हा माथाडी असंरक्षीत कामगार मंडळ कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी तरुणाने अर्ज केला होता. कंत्राटी सिक्युरीटी गार्डच्या नोकरीची ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात गोपाळ कडू चौधरी यांनी सुरुवातीला २ लाख १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रादाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान आज लाचेच्या रकमेचा पहिला हप्त्याची ३० हजारांची लाच घेतांना शिपाई गोपाळ कडू चौधरी यांना लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. आज न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content