नंदुरबार येथील नाभिक बांधवांवर हल्ला करणाऱ्यांचा अखिल भारतीय जीवा सेनेतर्फे निषेध ( व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नंदुरबार येथील नाभिक समाजातील दोन जणांवर त्यांच्या दुकानात घुसून धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्लाकरून जखमी केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने गुरुवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार येथील नाभिक समाज बांधव दीपक सूर्यवंशी व मुकेश सूर्यवंशी हे दोघे भाऊ यांचे सलून दुकान आहे. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी दोन्ही भाऊ व त्यांचे कारागीर हे त्यांच्या दुकानात काम करत असताना अज्ञात ४ व्यक्ती हातात लाट्या-काठ्या व धारदार शस्त्र घेऊन दुकानात घुसले. व त्यांनी दीपक सूर्यवंशी व राकेश सूर्यवंशी या दोन्ही भावांना काहीही कारण नसताना जीवघेणा हल्ला चढवला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहे, या व्हिडिओचे चित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले आहे. दरम्यान या हल्लेखोरांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी जळगाव शहरातील अखिल भारतीय जीवा सेना संघटनेच्या वतीने गुरुवार २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी अखिल भारतीय जिवा सेना युवक प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ जगताप, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भाऊ झुरके,  जिल्हा सहसचिव संजय भाऊ सोनवणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हाध्यक्ष कांतीलाल वाघ, जिल्हा सचिव जगन वखरे, नाभिक हितवर्धक संघ शहराध्यक्ष अरुण वसाने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सल्लागार नारायण  सोनवणे, राजेंद्र बापू सूर्यवंशी, मधुकर पितांबर निकम, अरुण पोपट बोरसे , देविदास चावदस ठाकरे, अरुण दगा निकम, अनिल अण्णा सूर्यवंशी, सुरेश ओंकार कुवर, आत्माराम गोविंदा महाले, भरत प्रभाकर निकम, पद्माकर सुकलाल निकम, गोरख नगराज शिरसाट, संदीप अरुण वसाने, तात्या भाऊ फुलपगारे, सुनील भालचंद्र नेरपगार, राजेंद्र सुकलाल ठाकरे, दिलीप रामभाऊ फुलपगारे आदी समाज उपस्थित होते.

Protected Content