केमिस्ट असोसिएशनतर्फे ना. पाटील यांना सन्मानपत्र देऊन सत्कार

जळगाव प्रतिनिधी । सैनिक जसा देशाच्या सीमेवर कोणतीही अपेक्षा न करता सेवा करतो, अगदी त्याच प्रमाणे औषधी विक्रेते देखील निस्वार्थ सेवा करत असतात. कोरोनाच्या आपत्तीमध्ये सगळीकडे हाहाकार माजला असतांना केमिस्ट बांधव अतिशय धाडसाने मैदानात पाय रोवून उभे होते. आज कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून याचे मोठे श्रेय औषधींचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा न पडू देणार्‍या औषधी विक्रेत्यांना जाते असे गौरवोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनतर्फे कोरोना योध्दा आणि लोकनेता म्हणून ना. गुलाबराव पाटील यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा देखील गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनतर्फे केमिस्ट भवनात आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, असोसिएशनचे उपाध्यक्ष शामकांत वाणी ब्रिजेश जैन रुपेश चौधरी , श्रीकांत पाटील,  शांतीलाल पाटील,कनकमल राका, प्रदीप देशमुख, संजय तिवारी, भानुदास नाईक,खालिद भाई, शैलेश राठोड,  पंकज पाटील, दिनेश मालू, अनुरुद्ध सरोदे, अमित गुळवे, साहेबराव भोई, रमाकांत सोनवणे , अविनाश महाजन , संजय नारखेडे यांच्यासह सर्व तालुका , शहर व विभागाचे अध्यक्ष व मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे सन्मानपत्राचे वाचन  सचिव अनिल झंवर यांनी केले. यात नमूद केले आहे की, नामदार गुलाबराव पाटील हे लोकनेते आहेत. निश्‍चयाचा महामेरू, जीवाला जपणारे नेतृत्व, धडाडी, जीवाची पर्वा न करता सेवेत पूर्णपणे झोकून देणारे, सदाबहार नेतृत्व, मुलूख मैदान तोफ, सदैव मदतीसाठी तत्पर असणारे व दूरदृष्टी असणारे, अष्टपैलू आणि अष्टावधानी असे आमचे लाडके भाऊ ना. गुलाबरावजी पाटील यांनी कोरोना काळात केलेले कार्य हे अद्वितीय असेच आहे. आपल्या या सेवेबद्दल जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना अभिमान वाटत असून या सन्मानपत्राच्या माध्यमातून आपल्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आपल्याला कोविडयोध्दा आणि लोकनेता म्हणून आपला गौरव करण्यात येत आहे. हे सन्मानपत्र टाळ्यांच्या गजरात ना. गुलाबराव पाटील यांना अर्पण करण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांना देखील सन्मानीत करण्यात आले.

या सत्काराला उत्तर देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी केमिस्ट बांधव आणि त्यांच्या असोसिएशनचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव केला. राजकारण्यांना बरं म्हटले की, आम्हाला जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. माणुसकी हीच संपत्ती असणारा माणूस हा सर्वात मोठा असतो. याचा विचार करता केमीस्ट बांधव मानवतावादी कार्य करत असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उधळली. तर, जिल्ह्यातील केमीस्ट बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अयाज मोहसीन यांनी केले. तर आभार प्रदर्शन रुपेश चौधरी यांनी केले.

 

 

Protected Content