हरिविठ्ठल नगरात गरजूंना मिठाई व फराळाचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरात श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, मी मराठी प्रतिष्ठान व सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेतर्फे २० दिव्यांग जनतेला गौवत्सल पुजनाचा मान देत पत्रकार बाधवांच्याहस्ते गरजु ३५ परिवारांना मिठाई व फराळाचे आज वाटप करण्यात आले आहे.

सदैव सण उत्सवात एकटा पडणारा हा घटक आपल्यातलाच हि जाणीव करुन देणारी वेळ आहे. एक दिवा शहिदांसाठी तसेच हि दिवाळी दिव्यांगांसाठी व पत्रकार बांधवांसाठी साजरी करु या, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या इश्वरी कार्यासाठी संदीप जी माळी(तरुण भारत उप संपादक ), शैलेश जी ठाकूर  (महाराष्ट्र सारथी संपादक ), आबा मकासरे (दिव्य मराठी फोटोग्राफर ), गोकुळ सोनार (लोकमत फोटोग्राफर), संदीप होले( live Trend ) अशा प्रमुखांनी वेळावेळ काठुन आले व समाजाला अंध अपंग व्यक्तींना मिठाई फराळ देऊन सद्भावनेची लाभदायक दिवाळी साजरा करुन दाखवली.

सुचीताताई यांनी वसुबारस निमित्त आपण गोमातेची पूजा करून दिवाळीची सुरुवात करावे आणि वर्षभरात श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान सर्वज्ञ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वर्षभरात रक्तदान शिबिर, वृक्षरोपण, लसीकरण केंद्र आशादीप मध्ये महिलांना साड्या वाटप भिल्ल वस्ती मध्ये गरजू लोकांना कपडे वाटप असे कार्यक्रम घेतले आहे. अशी पूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाचे नियोजन दीपक दाभाडे  सुरज दायमा यांनी केले सूत्रसंचालन राहुल परकाळे यांनी केले कार्य यशस्वी करण्यासाठी संदीप दाभाडे, आबा माळी, अभिषेक मकासरे, दिनेश खारकर, विकी कोळी, दीपक ठाकूर, जितेंद्र दाभाडे, अतुल पवार, नंदुशेठ सनांसे, पप्पू जगताप, सुरज तडवी, सागर ठाकुर, गोपाल राजपूत यांच्यासह आदि सर्व कार्यकर्तांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content